BNR-HDR-TOP-Mobile

Lonavala : सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी संध्या खंडेलवाल बिनविरोध

विषय समिती आणि स्थायी सदस्य पदाची निवडी बिनविरोध

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज -लोणावळा नगरपरिषदेच्या सभागृहात पिठासिन अधिकारी आणि मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या विषय समित्यांच्या सर्व सभापती पदाच्या निवडी बिनविरोध पार पडल्या. मुख्याधिकारी सचिन पवार यांनी त्यांना सहाय्यक म्हणून काम पाहिले.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानामुळे मागील दोन वर्षापासून प्रकाशझोतात आलेल्या सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी काॅग्रेस आयच्या नगरसेविका संध्या खंडेलवाल यांची तर बहुचर्चित पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी भाजपाचे नगरसेवक देविदास कडू यांची निवड झाली.

यासह शिक्षण समिती सभापतीपदी भरत हारपुडे, बांधकाम समिती सभापतीपदी काॅग्रेसचे संजय घोणे, महिला आणि बालकल्याण समिती सभापतीपदावर काॅग्रेसच्या सुर्वणा अकोलकर तर उपसभापती पदावर भाजपाच्या गौरी मावकर यांची बिनविरोध निवड झाली.

नगराध्यक्षा ह्या स्थायी समितीच्या पदसिध्द अध्यक्ष असल्याने सुरेखा जाधव यांची स्थायीच्या अध्यक्षपदावर निवड झाली तर वरील सर्व विषय समित्यांचे सभापती हे स्थायीचे पदासिध्द सदस्य आहेत. यासह उर्वरित तिन सदस्य म्हणून काॅग्रेसच्या गटातून निखिल कविश्वर, शिवसेनेच्या गटातून शादान चौधरी यांची निवड झाली.

तिसर्‍या सदस्याकरिता भाजपाने नामनिर्देशन न भरल्याने आरपीआयचे दिलीप दामोदरे आणि अपक्ष राजु बच्चे यांच्यात चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये राजु बच्चे यांची चिठ्ठी निघाल्याने स्थायीच्या सदस्यपदी अपक्ष नगरसेवक राजु बच्चे यांची निवड झाली.

उपनगराध्यक्ष हे नियोजन समितीचे पदसिध्द सदस्य असल्याने श्रीधर पुजारी यांची सभापतीपदी निवड झाली. तर सदस्य पदावर भाजपाच्या रचना सिनकर आणि बिंद्रा गणात्रा, काॅग्रेसच्या पुजा गायकवाड, निखिल कविश्वर, शिवसेनेचे नितिन आगरवाल, माणिक मराठे तर महालक्ष्मी लोणावळा सुधार समिती गटाच्या अपक्ष नगरसेविका अंजना कडू यांची निवड झाली.

HB_POST_END_FTR-A2

.