Sangali News : प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे आज सकाळी वयाच्या 75व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. सांगलीमधील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

आकाशवाणी आणि दूरदर्शनची मान्यता मिळवलेले कवी अशी त्यांची ओळख होती. मराठी, हिंदी, उर्दू यां भाषेतील अनेक मासिकांत त्यांच्या गझला आणि कविता प्रकाशित झाल्या आहेत. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ते काव्यवाचनांचे आणि गझलांचे जाहीर कार्यक्रम घ्यायचे. नवोदित कवींसाठी ते कार्यशाळाही घेत होते. मराठी गझल विश्व समृद्ध करण्यात इलाही जमादार यांचा मोठा वाटा आहे.

इलाही जमादार यांनी या क्षेत्रांत कमी काळात मोठे नाव कमावल्याने सुरेश भटांनंतर मराठी गझल क्षेत्राला समृद्ध करणारा गझलकार म्हणून इलाही यांचे नाव घेतले जाऊ लागले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.