Sangavi : सोशल मिडियावरील मित्राने घातला दोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – सोशल मिडियावरून आभासी ओळख झालेल्या (Sangavi ) मित्राने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका व्यक्तीला दोन लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना 17 ऑगस्ट ते 25 सप्टेंबर या कालावधीत सांगवी परिसरात घडली.
जितेशकुमार वशिष्ट बरनवाल (वय 42, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 12103291965 या क्रमांकावरून बोलणारा डॉ. केलीमिचेल आणि 9233728936 या क्रमांकावरून बोलणारी महिला (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला (Sangavi ) आहे.
Hinjawadi : आयटी पार्क असलेल्या हिंजवडीत सरपंच निवडीवरून मंडल अधिकाऱ्यांसमोर राडा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी सोबत व्हाटस अप या सोशल मिडियाद्वारे ओळख केली. फिर्यादिसोबत मैत्री वाढवून आरोपीने तो अमेरिकेतून भारतात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर तो भारतात आला असून त्याला दिल्ली येथे कस्टम ऑफिस येथे पकडले आहे, असे फिर्यादीस सांगून बनावट लेटर पाठवण्यात आले.
त्यानंतर एका महिलेने ती कस्टम ऑफिस मधून बोलत असल्याचे भासवून फिर्यादी यांच्या मित्राला पकडण्यात आले असल्याचे भासवून दिले. आरोपीने स्वताला सोडविण्यासाठी म्हणून फिर्यादीकडून वेळोवेळी दोन लाख तीन हजार 500 रुपये घेत फिर्यादीची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत (Sangavi ) आहेत.