Sangavi: अरविंद एज्युकेशन सोसायटीत अभिनव पद्धतीने साजरा केला राष्ट्रीय विज्ञान दिवस

एमपीसी न्यूज – राष्ट्रीय विज्ञान  दिनानिमित्त जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालय आणि लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी  मीडियम च्या विद्यार्थ्यांनी विज्ञाना बरोबर गणित, इतिहास, भूगोलाच्या प्रतिकृती  सादर  करून नवीन पायंडा पाडत विज्ञान दिन साजरा केला.  

 

या प्रदर्शनाचे उद्घाटन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, शिक्षक व पालक आदी मान्यवर उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात वाहते झरे, विविध भूरूपे, पृथ्वीचे अंतरंग, पास्कलचा त्रिकोण, चौकोनाचे प्रकार, कोरोना व्हायरस, चुंबकीय विलगीकरण पद्धत, समुद्रातील परिसंस्था, शेतीतील पारंपरिक पद्धती, किल्ले, पायथागोरसचे प्रमेय असे एकाहून एक वेगवेगळे प्रकल्प सादर केले तसेच सिंधुदुर्ग किल्ला, चौकोनाचे प्रकार, कोरोना व्हायरस, चुंबकीय विलगीकरण पद्धत, हिडन सिक्युरिटी अलार्म, किडनीची कार्यपद्धती, कचरा व्यवस्थापन केंद्र, समुद्रातील परिसंस्था, शेतीतील पारंपरिक पद्धती, पायथागोरसचे प्रमेय आदी प्रकल्प ठेवण्यात आले होते.

 

पाचवी ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या प्रकल्पांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होतो . विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या पालकांनी  प्रयोग समजून घेत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

 

शिक्षिका नीलम पवार, मुक्ता उपाध्ये, मंगल आढाव, स्वाती शेडगे, सोनाली आवळे, सीमा लड्डा, प्रणाली पाटील, स्वाती तोडकर, अंकिता सपकाळे, स्मिता बर्गे, हरिदिनी निर्मळ, सुरेखा वाणी, आशा घोरपडे, रिंकू शिंगवी, प्रिया मेनन यांनी या प्रयोगांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.