Sangavi : जुन्या भांडणाच्या रागातून एकाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज –  जुन्या भांडणाचा राग मनात धरून तिघांनी घरात घुसून एकाला ( Sangavi)  कोयत्याने मारहाण केली आहे. ही घटना सोमवारी ( दि.20) पिंपळे गुरव येथे घडली.

सनी अशोक खापरे (वय40 रा.पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून निखिल राजेंद्र जाधव (रा.पिंपळे गुरव) व जियदिप राठोड व त्याचा मित्र यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Dehugaon : देहूच्या उपनगराध्यक्षांसह दोन स्विकृत नगरसेवकांचा राजीनामा मंजूर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याशी असलेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी फिर्यादी यांच्या घरात कोयता घेऊन घुसले. यावेळी आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत कोयत्याने डोक्यात मारहाण केली.

यावेळी शेजारी गोळा झाले असता आरोपींनी त्यांना ही कोयत्याने धाक दाखवून दहशत निर्माण केली.सांगवी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील ( Sangavi)  तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.