Sangavi Crime News : मुलीच्या विनयभंग प्रकरणी सावत्र बापावर गुन्हा

एमपीसी न्यूज – मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग करणा-या सावत्र बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 16 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत सांगवी परिसरात घडला.

पीडित मुलीच्या आईने याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 43 वर्षीय सावत्र बापावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी यांचा दुसरा पती आहे. फिर्यादी यांना पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीसोबत वारंवार अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. याबाबत मुलीने आईला सांगितले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, सावत्र बापाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, पॉस्को कलम 8, 12, 18 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.