Sangavi Crime News : पिंपळे निलख येथील मोबाईल शॉपी फोडल्याप्रकरणी दोघांना घेतले ताब्यात 

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख येथील मोबाईल शॉपी फोडून महागडे मोबाईल चोरून नेल्याची घटना 03 सप्टेंबर रोजी घडली होती. या घटनेतील दोन आरोपींना गुन्हे शाखा, युनिट चार यांनी ताब्यात घेतले असून 4 लाख 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी (दि.08) आरोपींना कोकणे चौक येथून ताब्यात घेतले. 

कमलेश चंद्रकांत रणपिसे (वय 23, रा. भीमनगर कामशेत, मुळशी) आणि तुषार नितीन डुकरे (वय 20, रा. मिलिंद नगर, पिंपरी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलखमध्ये घडलेल्या मोबाईल शॉपी चोरीचा प्रकार उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी आदेश दिले होते. त्यानुसार विश्लेषणात्मक तपासातून वरील आरोपी कोकणे चौक याठिकाणी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. चौकशीअंती आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून महागडे मोबाईल तसेच ॲक्सेसरीज आणि एक ऑटो रिक्षा असा एकूण 4 लाख 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.