Sangavi: टास्कच्या बदल्यात 14 हजार देऊन महिलेकडून लुबाडले साडे अकरा लाख

एमपीसी न्यूज – ऑनलाइन टास्कच्या बदल्यात 14 हजार रुपये देऊन महिलेकडून(Sangavi) चक्क साडे अकरा लाख रुपये लुबाडले आहेत. ही फसवणूक 4 मे 5 मे 2024 या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घडली आहे.

याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे फिर्यादीवरून 9324688076 या मोबाईल क्रमांक (Sangavi)धारकावर व https://t.me/sharmakiaraofficial यात टेलिग्राम खाते धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

Kalewadi: पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी व्हाट्सअप द्वारे फिर्यादी यांच्याशी संपर्क साधला. तेथे त्यांना टास्क द्वारे कमाई करण्याचे आमिष दाखवले. यावेळी त्यांना प्रीपेड असू देऊन 14 हजार 300 रुपयांची कमाई करून दिली यावेळी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत आरोपींनी नंतर प्रीपेड टास्क देत फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी तब्बल 11 लाख 25 हजार रुपये बँक खात्यावर घेत त्यांची फसवणूक केली.

त्यानंतर फिर्यादी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.