Sangavi: तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण

एमपीसी न्यूज – घराबाहेर खेळत असलेल्या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. ही घटना जुनी सांगवी येथील मुळानगर झोपडपट्टीत घडली. 

तनुष (वय 3, रा. मुळानगर झोपडपट्टी, जुनी सांगवी) असे अपहरण झालेल्या चिमुरड्याचे नाव आहे.

  • याप्रकरणी त्याचे वडील (वय 25) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तनुष हा रविवारी (दि. 24) सकाळी दहाच्या सुमारास घरासमोर खेळत होता. यावेळी कोणीतरी त्याला पळवून नेले. फौजदार सुधीर पाटील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.