BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : सांगवीतील संरक्षण खात्याच्या हद्दीत बिबट्याचा वावर

0 3,251
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – औंध -सांगवी उपनगर जवळच्या संरक्षण खात्याच्या (सीक्यूएई) परिसरातील जंगलात सोमवारी (दि.13) सकाळी बिबट्याचा वावर झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे सीक्युएई प्रशासनाकडून सर्व कर्मचारी, रहिवाश्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. दरम्यान वन विभागाकडे यासंदर्भात कुठलीही कल्पना दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

सीक्युएईमध्ये संरक्षण विभागासाठी फायर फायटिंग उपकरणे आणि रसायने तयार करण्यात येतात. सोमवारी सकाळी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि काही नागरिकांच्या माहितीनुसार बिबट्या दिसल्याचे स्पष्ट झाले आहे. सीक्युएई परिसरात 65 टक्के जंगल आणि 35 टक्के इमारतींचे बांधकाम आहे. मुळा नदीलगत सांगवी उपनगराच्या भरवस्तीलगत बिबट्या दिसल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सीक्युएई प्रशासनाकडून लेखी परिपत्रकाद्वारे स्थानिक रहिवासी आणि सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना खबरदारी घेत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, उन्हाळ्यामुळे दररोज हजारो नागरिक पहाटे आणि रात्री अकरा वाजेपर्यंत चालण्यासाठी या परिसरात येत असतात. गेल्या दोन दिवसांपासून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली. यासंदर्भात वन विभागाला बिबट्या पकडण्यासंदर्भात सूचना आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3