Sangavi : तरूणीला मारहाण करत विनयभंग, तरूण गजाआड

एमपीसी न्यूज – तरूणीशी ओळख वाढवून तिचा पाठलाग करत हाताने मारहाण करत एका तरुणाने तिचा विनयभंग केला. हा प्रकार गुरूवारी (दि. 7)दुपारी साडेचार वाजता पिंपळेगुरव येथे घडला.

याप्रकरणी विलास अनंत सुपे (वय 26, रा. काशिदनगर, पिंपळेगुरव) याला अटक केली आहे. याबाबत 20 वर्षीय तरूणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी विलास सांगवीतील एकाच महाविद्यालयात पूर्वी शिकण्यासाठी होते. आरोपीने फिर्यादीशी ओळख वाढवून तिचा मोबाईल नंबर घेतला होता. विलास हा तरुणीचा वारंवार पाठलाग करत होता.

गुरूवारी दुपारी साडेचार वाजता आरोपीने तरुणीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच तिचा विनयभंग केला. सांगवी ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.