-MPC-TOP-MOST-BANNER-I

Sangavi News: ‘ क्रिकेटमध्ये मोठे यश मिळो’; आमदार जगताप यांनी क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडचा घरी जाऊन केला सत्कार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी करून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील ऋतुराज गायकवाड याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (गुरूवारी) घरी जाऊन कौतुक आणि सत्कार केला.

‘तू क्रिकेटमध्ये घेत असलेले कष्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुला या खेळामध्ये मोठे यश प्राप्त व्हावे. अशाच पद्धतीने तू पिंपरी-चिंचवडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवावे’, अशा शब्दांत आमदार जगताप यांनी ऋतुराजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ऋतुराजच्या या कतृत्वाबद्दल त्याच्या आई-वडिलांचे आमदार जगताप यांनी अभिनंदन केले.

आयपीएलच्या 13 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघातील एका नवोदित खेळाडूने चमकदार खेळी करून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले. चेन्नई सुपर किंग्ज हा संघ स्पर्धेच्या बाहेर पडला असला, तरी या नवोदित खेळाडूने आपल्या खेळाची सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले.

हा नवोदित खेळाडू म्हणजे पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारा ऋतुराज गायकवाड. ऋतुराज आपल्या आई-वडिलांसह जुनी सांगवीमध्ये वास्तव्याला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना शेवटच्या तीन सामन्यांमध्ये तीन अर्धशतके ठोकले आहेत. त्याच्या या खेळाने सर्व क्रिकेटरसिक प्रभावित झाले आहेत.

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याचे पिंपरी-चिंचवडनगरीत आगमन झाले आहे. त्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप हे ऋतुराजच्या घरी गेले. त्याच्या खेळाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. तसेच त्याने आयपीएलपर्यंत केलेल्या वाटचालीबाबत माहिती जाणून घेतली.

महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनीही ऋतुराजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्योजक धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, नवीन लायगुडे, संतोष कलाटे, कृष्णा भंडलकर आदी उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.