Sangavi News: हनुमान मित्र मंडळाने पटकाविला ‘महापौर चषक’

एमपीसी न्यूज – नवी सांगवीतील सुपर स्टार क्रिकेट क्लब व शिवराज क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट ‘महापौर चषक’ देहूरोड येथील हनुमान मित्र मंडळाने पटकाविला आहे. त्यांना भव्य चषक आणि 55 हजार 555 रुपयांचे बक्षिस देण्यात आले.

“महापौर चषक” क्रिकेट स्पर्धचे बक्षीस वितरण महापौर उषा ढोरे यांच्या शुभहास्ते संपन्न झाला. यावेळी नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका सीमा चौगुले, माधवी राजापुरे, मारूती तरटे, माऊली जगताप, धनंजय ढोरे, अजय दुधभाते, जवाहर ढोरे, गणेश बनकर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

सुपर स्टार क्रिकेट क्लब व शिवराज क्रिकेट क्लबतर्फे पाच दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. 13 ते 17 जानेवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत एकूण 33 संघानी सहभाग घेतला.

देहूरोड येथील हनुमान मित्र मंडळाने विजेतेपद पटकाविले. त्यांना भव्य चषक आणि 55 हजार 555 रुपयांचे बक्षिस देण्यात आले. वारजेतील आलम भाई पठाण क्रिकेट क्लबने द्वितीय बक्षिस मिळविले. त्यांना चषक आणि 44 हजार 444 रुपयांचे बक्षिस देण्यात आले. दापोडीतील ओम साई क्लब तृतीय, थेरगावातील जय गणेश क्रिकेट क्लबने अनुक्रमे तृतीय, चतुर्थ क्रमांक पटकाविला. आनंद चव्हाण मालिकावीरचा मानकरी ठरला. उत्कृष्ट फलंदाज राहुल लोहार, उत्कृष्ट गोलंदाज हरिश अर्जुने ठरले.

स्पर्धेचे संयोजन राहुल कोंढरे, सत्यवान भालेराव, समीर जाधव, विनोद कल्याणकर, जीवन जाधव यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like