Sangavi News : नवी सांगवीत मोकाट घोड्यांचा ‘रास्ता रोको’

एमपीसी न्यूज – नवी सांगवी परिसरात मोकाट घोड्यांचे टोळके ठिकठिकाणी दिसून येत आहे. रस्त्याच्या मधोमध थांबलेले घोडे वाहन आणि नागरिकांना जुमानत नाहीत त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, पादचारी नागरिकांना देखील भितीचा सामना करावा लागत आहे.

परिसरात मोकाट घोडी, कुत्री आणि इतर जनावरांचाही धोका वाहनचालकांबरोबरच जेष्ठ नागरिक, महीला व लहान मुलांनाही आहे. संध्याकाळच्या वेळी घोड्याचे मोठे टोळके पाहवयास मिळते. घोड्यांच्या टोळक्यात वळू देखील असल्याने पादचारी नागरिकांना जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. तसेच, वाहनांना धडक दिल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महानगरपालिकेने मोकाट घोड्याच्या बंदोबस्त करावा, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी व गजानन धाराशिवकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.