Sangavi News : शेअरचॅटवरुन शेअर झाला मोबाईल नंबर, व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज – शेअरचॅटवरुन महिलेचा मोबाईल नंबर शेअर झाला, त्यानंतर महिलेला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केला. 11 मार्च ते 07 एप्रिल 2022 या कालावधीत सांगवी परिसरात ही घटना घडली.

याप्रकरणी पिडित महिलेनं सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून सहा मोबाईल नंबर धारकांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शेअरचॅट हे मोबाईल ॲप्लिकेशन वापरत होत्या. त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्न देखील मिळत होते. ॲप्लिकेशनच्या माध्यमातून त्यांची अनेकांशी ओळख झाली.

 

त्यांनतर फिर्यादी यांचा मोबाईल नंबर शेअर झाला. फिर्यादी यांना व्हॉट्सॲपवर वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरुन अश्लील मेसेज व फोटो एडिट करून सोशल मीडियावर शेअर केले. याबाबत विचारणा केली असता आरोपींनी धमकी दिली असे फिर्यादीत नमूद केले आहे.

सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.