Sangavi News: महेश मंडळाच्या उत्पादन व विक्री प्रदर्शनाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – सांगवी परिसर महेश मंडळ (महिला समिती,), पुणे द्वारा महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देण्यासाठी संक्रांतीनिमित्त उत्पादन प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

माहेश्वरी चौक, नवी सांगवी जवळील मल्हार गार्डन येथे हे प्रदर्शन झाले. यात 25 हून अधिक स्टॉल्सवर महिला उद्योजकांकडून सैंधव मीठ, लोणचे, खारे पदार्थ तसेच बेकरी पदार्थ, देवाची अलंकारिक वस्त्रे, साड्या, ड्रेस, मेणबत्त्या, इतर कपडे आणि अनेक घरगुती वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले होते.

प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते श्री महादेवाच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करुन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले. महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी स्थानिक नगरसेविका शारदा सोनावणे, इतर मान्यवर नागरिकांसह 500 हून अधिक नागरिकांनी हजेरी लावली. कोविड 19 च्या संदर्भांतील सर्व नियम पाळले गेले.

पद्मा लोहिया, नम्रता नावंदर , गौरी नावंदर , श्रुती मंत्री, जमना राठी, कविता लढ्ढा आदींनी समितीतर्फे आयोजनाची जबाबदारी उचलली. या प्रदर्शनात महिलांचा उत्साह पाहून महापौरांनी खूप कौतुक केले. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा आयोजनाची गरज असल्याचे महापौरांनी सांगितले, अशी माहिती सतीश लोहिया यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.