Sangavi News : नवी सांगवी परिसरात उस्मानाबादी बोकडांची दहशत

एमपीसी न्यूज – नवी सांगवी परिसरात उस्मानाबादी व इतर जातींच्या बोकडांनी दहशत निर्माण केली आहे. रस्त्यावर दोन किंवा चार जणांच्या गटागटाने हे बोकड बिनधास्तपणे फिरत आहेत. नागरिकांच्या कुंडयातील, फुलं, झाडे, छोटी फळझाडे आणि वेलींचे नुकसान करत आहेत.

यामुळे लहान मुले व विशेषतः महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केल्यास ते अंगावर धावून येतात. हे बोकड गल्ली बोळात रस्त्याच्या मधोमध चालत असतात व रस्त्यामध्येच ठाण मांडून बसतात. मोठ्या आवाजात ओरडतात, यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

_MPC_DIR_MPU_II

मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संघटनेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले, ‘हे बोकड कुणी सोडले आहेत याची कल्पना नाही. पण आजही ग्रामीण भागात देवाला नवस म्हणून बोकड सोडले जातात. तसे तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो.

तसेच, रात्रीच्या वेळी बोकडं गायब होतात आणि दुसऱ्या दिवशी परत रस्त्यावर भटकताना दिसतात. पालिकेने अशा मोकाट बोकडांचा शोध घेऊन वेळीच पायबंद घालावा’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.