Sangavi News: आयुक्तांनी घेतला सांगवीतील विकासकामांचा आढावा

एमपीसी न्यूज – जुनी सांगवी परिसरात सुरु असलेली रस्त्यांची विकास कामे आणि प्रस्तावित विकासकामांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी पाहणी दौरा केला व विकासकामाचा आढावा घेतला.

प्रस्तावित मधूबन सोसायटी परिसरातील 12 मीटर डी. पी. रस्ता, मुळा रोडचा 18 मीटर रस्ता, खेळाचे मैदान, सांस्कृतिक केंद्र, सांगवी बोपोडी पूल, पी. डब्ल्यू. डी. मैदानाशेजारील  रस्त्यालगत झालेले अतिक्रमण व विकासकामाबाबत अधिका-यांसह पाहणी केली.

या वेळी महापौर उषा ढोरे, ह प्रभाग सभापती हर्षल ढोरे, नगरसेविका शारदा सोनवणे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, नगररचना विभागाचे उपसंचालक  प्रभाकर नाळे, सहशहर अभियंता अशोक भालकर, श्रीकांत सवणे, सतिश इंगळे, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, प्रमोद ओंबासे, सुनिल वाघुंडे, जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.