Sangvi: फुटपाथवर कचरा टाकताय ? अगोदर पाटी वाचा !

सांगवीत लावलेल्या पाटीने कचरा टाकणाऱ्यांची केली गोची

एमपीसी न्यूज – एखाद्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पुण्यात पाट्या लावल्या जातात. पुणेरी पाट्यांची जोरदार चर्चा होते असते. आता पिंपरी-चिंचवडच्या सांगवीत देखील कच-याच्या समस्येने वैतागलेल्या एका नागरिकाने ‘अजब’ फलक लावल्याचे समोर आले आहे. त्या फलकावर ‘येथे कचरा टाकणारा..दोन बापाचा.. आता..टाक कचरा…एक वैतागलेला नागरिक’ असा मजकूर फलकावर लिहिला असून याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे. याचा फोटो सोशल मिडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कच-याची समस्या उग्र झाली आहे. नियमितपणे कचरा उचलला जात नाही. कचरा कुंड्यातील कचरा देखील रिकामा केला जात नाही. कचरा कुंड्या ओव्हर फ्लो झालेला असतात.

सांगवीतील एक फुटपथावर कचरा टाकला जात होता. त्याठिकाणी कचरा टाकू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा महापालिकेचा बोर्ड आहे. तरी, देखील कचरा टाकला जात होता. त्यामुळे वैतागलेल्या एका नागरिकाने तिथे एक फलक लावला आहे. ‘येथे कचरा टाकणारा..दोन बापाचा.. आता..टाक कचरा…एक वैतागलेला नागरिक’ असा मजकूर लिहिला असून याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.