Sangavi : बेकायदेशीररित्या दारू बाळगणाऱ्या एकावर गुन्हा; 35 हजारांची दारू जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या दारू बाळगणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 35 हजार 84 रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी केली आहे.
होशियार लक्ष्मण सिंग (वय 26, रा. पिंपळे सौदागर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस नाईक तुषार शेटे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन बिल्डिंगच्या शेजारी सुरू असलेल्या बांधकामाजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये एक व्यक्ती  बेकायदेशीररित्या दारू विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा मारून 35 हजार 84 रुपये किमतीच्या 159 दारूच्या बाटल्या जप्त केल्या. होशियार सिंग याच्यावर भारतीय दंड विधान कलम 269, साथीचे रोग प्रतिबंधक कायदा कलम 2, 3, 4 तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.