Sangavi: ‘मर्सिडिज बेंझ’मध्ये नोकरीच्या अमिषाने तरुणाची सव्वासहा लाखांची फसवणूक

The youth with the lure of getting a job froud of Six lakh Rs

एमपीसी न्यूज – बेंगळुरूमधील मसर्डिज बेंज या कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखवून जॉब रिक्रुटस कंपनीच्या प्रतिनिधीने एका उच्च शिक्षीत तरूणाची सव्वा सहा लाखांची फसवणूक केली. हा प्रकार सांगवी येथे नुकताच उघडकीस आला.

याप्रकरणी रविकुमार विरप्पा एन्नीकोपाद (वय 29, रा. नवी सांगवी, मुळ, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. जॉब रिक्रुटस कंपनीचे सदाम आलम याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविकुमार यांना जॉब रिक्रुटस या ऑनलाईन कंपनीच्या आरोपी सदाम आलम याने मोबाईलवर संपर्क साधला.

आरोपीने त्यांना बेंगळुरूमधील मसर्डिज बेंज या कंपनीत नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी 6 लाख 21 हजार 200 रूपये ऑनलाईन घेतले. नोकरीचे खोटे नियुक्ती पत्र देऊन त्यांची फसवणूक केली.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.