Sangli: इस्लामपूरमध्ये हज यात्रेकरू कुटुंबातील 23 जणांना कोरोनाची बाधा, राज्यातील रुग्णांची संख्या 147 वर!

एमपीसी न्यूज – हज यात्रा करून परत आलेल्या इस्लामपूरमधील चार जणांच्या कुटुंबातील आणखी 12 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एकाच कुटुंबातील 23 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

सांगली जिल्ह्यात आज या 12 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 147 झाली आहे. हज यात्रेला जाऊन आलेल्या एकाच कुटंबातील चौघेजण कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्याने त्या परिवारातील सर्वांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात एकूण 23 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांगली जिल्ह्यातील या सर्व कोरोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.