Sangurdi Crime News : घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; एकास अटक

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी आईशेजारी झोपलेल्या मुलीला उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना खेड तालुक्यातील सांगुर्डी येथे उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

गणेश बबन आढाव (वय 35, रा. सांगुर्डी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 8 मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडला. फिर्यादी आणि त्यांची अल्पवयीन मुलगी घरात झोपल्या होत्या. त्यावेळी आरोपी फिर्यादी त्यांच्या घरात आला. त्याने फिर्यादी यांच्या शेजारी झोपलेल्या अल्पवयीन मुलीला उचलून दुस-या ठिकाणी नेले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

याबात भारतीय दंड विधान कलम 376 (आय) (जे), पॉक्सो कायदा कलम 3, 4, 5 (एम), 6, 9 (एम), 10 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.