Sangvi : जनता शिक्षण संस्थेस दहा संगणक भेट

एमपीसी न्यूज – शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी … ग्रंथ हेच गुरु … शिकाल तर जगाल हे उद्दिष्ट ठेवून सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने जुन्या सांगवीतील जनता शिक्षण संस्थेच्या मराठी प्राथमिक शाळेला १० संगणक (डेस्क टॉप) व्हेरिटास टेकनॉलॉजी पुणे यांच्या सहकार्याने भेट देऊन संगणक वर्ग चालू करण्यात आला .

इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी चढाओढ चालू असते. इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्याच्या तुलनेत मराठी शाळेतील विद्यार्थी या तांत्रिक युगात टिकून राहण्यासाठी सांगवी परिसर महेश मंडळातर्फे व्हेरिटास टेकनॉलॉजी पुणे यांच्या सहकार्याने १० संगणक (डेस्क टॉप ) भेट देऊन समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. समाजातील विविध संस्थांनी पुढे येऊन मराठी माध्यमातील शाळांसाठी अद्यावत आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले तर हे विद्यार्थी हि स्पर्धेच्या युगात मागे राहणार नाहीत, असे मत राजेश कासट यांनी व्यक्त केले.

  • या “माहेश्वरी संगणक ” वर्गाचे अनावरण राजेश कासट यांच्या हस्ते करण्यात आले. संगणक वर्गाचे नाव “माहेश्वरी संगणक” कक्ष असे ठेवण्यात आले. यावेळी नगरसेविका शारदा सोनवणे म्हणाल्या, माहेश्वरी समाजाच्या संस्कृतीने घेण्यापेक्षा देण्याला जास्त महत्व दिले आहे. महेश मंडळाचा हा उपक्रम अत्यंत कॊतुकास्पद आहे.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनोहर ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका शारदा सोनवणे, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाडेकर, सुभाष गारगोटे, किशोर गोरे, मंडळाचे अध्यक्ष सतीश लोहिया, सचिन मंत्री, मुकुंद तापडिया आदी उपस्थित होते. प्रास्तविक शाळेच्या कल्पना सोनवणे यांनी केले तर, आभार संतोष नवले यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.