Sangvi : फ्लॅटचे बनावट बक्षीस पत्र तयार करून वृद्धाची 16 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – खरेदीखत केलेल्या फ्लॅटचे बनावट बक्षीस पत्र तयार करून त्याआधारे बँकेतून 16 लाखांचे कर्ज काढून दांपत्याने वृद्धाची फसवणूक केली. हा प्रकार लक्ष्मीनगर पिंपळे गुरव येथे घडला.

गजानन शंकर भुजाड (वय 67, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तुकाराम कोंडीबा उर्फ कोंडीराम महामुनी, राधा तुकाराम महामुनी (दोघे रा. माउली कृपा, लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गजानन यांनी आरोपी महामुनी यांच्याकडून माउली कृपा, लक्ष्मीनगर पिंपळे गुरव येथील एक 338 चौरस फुटचा एक फ्लॅट विकत घेतला. 1 जानेवारी 2014 रोजी त्याचे हवेली निबंधक कार्यालयात नोंदणी केली. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून गजानन यांच्या नावावर असलेल्या फ्लॅटच्या जागेचे हवेली निबंधक कार्यालय येथे मार्च 2015 मध्ये बनावट बक्षीसपत्र तयार केले. या बक्षीसपत्राचा वापर करून ए यु स्मॉल फायनान्स बँकेच्या पिंपरी शाखेतून 16 लाख रुपयांचे कर्ज घेतले. यावरून गजानन यांनी त्यांच्या नावावर असलेल्या फ्लॅटचे बनावट बक्षीसपत्र तयार करून त्याद्वारे कर्ज घेतल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.