Sangvi : कागदपत्रांचा गैरवापर करून सिमकार्ड घेऊन विदेशी तरुणाला दिल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कागदपत्रांचा गैरवापर करून त्याआधारे दोन सिमकार्ड खरेदी केले. ते सिमकार्ड विदेशी तरुणाला वापरण्यास दिले. याबाबत सिमकार्ड खरेदी करणा-या आणि वापरणा-या अशा दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दापोडी रोड, नवी सांगवी येथे घडली.

प्रशांत पुनाजी भंडारकर (वय 49, रा. नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रोहन दत्तात्रय करडे (वय 35, रा. नवी सांगवी), व्हॅलेंटाईन उर्फ जेम्स अमुचे ईझेजा (वय 28, रा. कात्रज) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 6 नोव्हेंबर 2018 ते 22 जून 2019 या कालावधीत घडली. फिर्यादी भंडारकर आणि त्यांचे मित्र विशाल मधुकर मोरे (रा. सोलापूर) यांचे आधारकार्ड आणि फोटोचा गौरवपर करून आरोपी रोहन याने दोन सिमकार्ड खरेदी केली. हे सिमकार्ड रोहन याने परदेशी नागरिक व्हॅलेंटाईन याला वापरण्यासाठी दिले. स्वतःच्या नावावर सिमकार्ड नसल्याचे माहिती असतानाही व्हॅलेंटाईन याने ते वापरल्याबाबत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like