Sangvi : सराईत चोरट्याकडून 24 मोबाईल जप्त; सांगवी पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – सराईत मोबाईल चोराला अटक करून त्याच्याकडून सुमारे 1 लाख 26 हजार रुपये किमतीचे 24 मोबाईल फोन जप्त केले. ही कारवाई सांगवी पोलिसांनी केली. हा चोरटा पहाटेच्या वेळी उघड्या दरवाजावाटे मोबाईल फोनची चोरी करीत असे.

रमेश ऊर्फ तिम्म्या महादेव देवकीरी (वय 22, रा. जुनी सांगवी. मूळ रा. यादगीर, राज्य – कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या सराईत चोरट्याचे नाव आहे.

  • वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दीपक पिसे आणि अरुण नरळे हे चोरीला गेलेल्या सिम कार्डची माहिती घेत होते. दरम्यान, तांत्रिक तपास करत असताना चोरीला गेलेला एक मोबाईल जुनी सांगवी येथे वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी जुनी सांगवी परिसरात सापळा रचून आरोपी देवकीरी याला ताब्यात घेतले.

देवकीरी याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये दोन महागडे मोबाईल पोलिसांना मिळून आले. या मोबाईलबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता देवकीरी याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने शहरातून 1 लाख 26 हजार रुपये किमतीचे 24 मोबाईल चोरल्याची कबुली दिली. देवकीरी हा सराईत गुन्हेगार असनू त्याच्यावर सांगवी आणि फरासखाना पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सांगवी पोलीस ठाण्यातील दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

  • ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, यशवंत साळुंके, कर्मचारी चंद्रकांत भिसे, कैलास केंगले, सुरेश भोजने, रोहिदास बोऱ्हाडे, नितीन दांगडे, अरुण नरळे, दीपक पिसे, नितीन खोपकर, विनायक देवकर, शशिकांत देवकांत, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.