Sangvi : आम्मा भगवान येणार असल्याचे सांगत अनुयायांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव मधील निळु फुले नाट्यगृहात सत्संगसाठी आम्मा भगवान येणार आहेत, अशी बतावणी करुन सुमारे 200 अनुयायांची फसवणूक केल्याची घटना सांगवी येथे घडली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 14) उघडकीस आला.

अस्मिता अनिल राव (वय 36, रा. गणेश नगर, डांगे चौक, थेरगाव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धेश सदानंद राऊत (वय 20, रा. जुनी सांगवी) याला अटक केली आहे. त्याचे साथीदार विठ्ठल सोनवणे, मुकुंद वामणे, मिलिंद (पूर्णनाव व पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्मा भगवान या फलटण येथे आल्या असून त्या शुक्रवारी (दि. 11) पिंपळे गुरव येथील निळु फुले नाट्यगृहात येणार आहेत. अशी बतावणी करुन नागरिकांना तसे एसएमएस पाठवून त्यांच्याकडून प्रत्येकी 200 ते 300 रुपये घेतले. शुक्रवारी फिर्यादी व त्यांचे सोबती वसंत पाटील हे नाट्यगृहाजवळ गेले असता असा कोणताही कार्यक्रम येथे नसल्याचे उघड झाले.

यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले व त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी त्यातील एकाला अटक केली असून. अम्मा भगनाव या त्यांच्या आश्रमाशिवाय कोठेही जाहीर कार्यक्रमासाठी जात नाहीत असे उघडकीस आले. त्यानुसार सांगवी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्तापर्यंत फसवणूक झालेल्यांची संख्या 200 च्या आसपास आहे, मात्र ही संख्या वाढण्याची देखील शक्‍यता पोलिसांनी वर्तवली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.