Sangvi : नामांकित कंपनीत नोकरीच्या अमिषाने 49 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नामांकित कंपनीमध्ये नोकरी लावतो, असे सांगून एका इसमाची 49 हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपळे गुरव येथे 1 मार्च रोजी घडली.

‘सोसफॉर नोकरी डॉट कॉम’ या वेबसाइटवरील एचआर मॅनेजर मनिष पॉल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ऍन्सी चाको (वय 49, रा. जयगणेश प्लाझा, शिवराम नगर, पिंपळे गुरव) यांनी मंगळवारी (दि. 17) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास फिर्यादी यांनी सोसफॉर नोकरी डॉट कॉम या वेबसाइटवरील आरोपीच्या फोनवर फोन केला. त्यावेळी आरोपी मनिष पॉल याने टाटा कंपनी आणि एल ऍन्ड टी कंपनीत नोकरी लावतो, असे अमिष दाखवून फिर्यादी ऍन्सी यांच्याकडून 48 हजार 908 रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना नोकरी न देता फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.