Sangvi : पिंपळे गुरव येथे 64 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथे पोलिसांनी 63 हजार 866 रुपये किमतीचा गुटखा आणि तत्सम पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 8) दुपारी साडेचारच्या सुमारास पिंपळे गुरव येथे करण्यात आली आहे.

 

अन्न सुरक्षा अधिकारी राजेंद्र रघुनाथ काकडे (वय 52) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भोलाराम जसराम चौधरी (वय 31, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. राजस्थान) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वाहनचोरी विरोधी पथकाला पिंपळे गुरव येथे एकजण बेकायदेशीररित्या गुटखा आणि तत्सम पदार्थ बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात तर छापा मारून 63 हजार 866 रुपये किमतीचा गुटखा आणि तत्सम पदार्थ जप्त केला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.