Sangvi : तरुणीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – दोन वर्षांपासून तरुणीचा वारंवार पाठलाग केला. तसेच तिला फोन करून सर्व विषयात नापास करण्याची धमकी दिली. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आल आहे. ही घटना सप्टेंबर 2018 ते मे 2020 या कालावधीत सांगवी परिसरात घडली.

चंद्रकांत काशीनाथ जाधव (वय 45, रा. पिंपळे निलख) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 20 वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव हा वेळोवेळी फिर्यादी तरुणीचा पाठलाग करीत असे. माझी विद्यापिठात ओळख आहे. तुला सर्व विषयात नापास करतो, अशी धमकीही फोन करून आरोपीने फिर्यादी तरुणीला दिली. याबाबत तरुणीने जाब विचारला असता ‘तुला काय करायचे ते कर. मी तुला आता सोडणार नाही,’ अशी पुन्हा धमकी दिली.

याबाबत तरुणीने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.