Sangvi : आईने दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी वडिलांकडून मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज – आईने वडिलांवर दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी वडिलांनी मुलाला मारहाण केली. तसेच मुलाच्या हाताला कडाकडा चावून जखमी केले. ही घटना 19 ऑगस्ट रोजी रात्री पिंपळे गुरव येथे घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि. 3) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नारायण सीताराम पवार (रा. पिंपळे गुरव) असे आरोपी पित्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलगा शंतनू नारायण पवार (वय 18) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंतनू यांची आई सारिका यांनी पती नारायण विरोधात 498 (अ) प्रमाणे गुन्हा नोंदवला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने मुलगा शंतनू याच्या हाताला कडाकडा चावा घेतला. यामध्ये हाताच्या मनगटाजवळ, तळहातावर, उजव्या हाताच्या अंगठ्याला गंभीर इजा झाली.

नारायण याने शंतनू याच्या डोळ्यात हाताची नखे मारून व लाकडी बॅटने पाठीवर मारून जखमी केले. तसेच शंतनू याला जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.