Sangvi : गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने घराला आग; जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने आग लागली. या आगीत घर जळून खाक झाले. ही घटना आज (रविवारी) सकाळी दहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

लिंगाप्पा जांबे यांच्या घराला आग लागली. त्यात त्यांचे घर जळून खाक झाले आहे. सुदैवाने घटनेची कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वादहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथील स्थानिक रहिवासी श्री महाजन यांनी अग्रेसिया सोसायटी जवळ मोकळ्या मैदानात असलेल्या एका पत्र्याच्या शेडला आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला.

भगवान यमगर, विवेक खंदेवाड, महेंद्र पाठक, चेतन माने, रुपेश वानखेडे, दादासाहेब मोरे, संदीप जगताप यांच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. घरामध्ये सकाळी गॅस सिलेंडर लिकेज झाल्याने आग लागली होती. त्यात सिलेंडरचा स्फोट झाला. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने घटनेची कोणतीही जीवितहानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.