Sangvi : पवनाथडी जत्रा स्थळाची नामदेव ढाके यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज – सांगवी येथील पी.डब्लू.डी. मैदानावर येत्या 4 मार्चपासून 8 मार्चपर्यंत पवनाथडी जत्रेचे आयोजन केलेले आहे. त्याची पाहणी पक्षनेते नामदेव ढाके यांनी शनिवार (दि.29) केली. पवनाथडी जत्रेसाठी स्थापत्यविषयक कामे त्वरित पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी स्थापत्य अभियंत्यांना त्यांनी केली.

यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, नागरवस्ती विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास जगताप, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, उपअभियंता विजयसिंह भोसले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, पॉईंट ऑफ व्ह्यूव संस्थेचे डॉ. गिरीश रांगणेकर, प्रसाद कुलकर्णी, सुमित जैन आदी उपस्थित होते.

पवनाथडी जत्रेत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री होणार असून महानगरपालिकेतर्फे मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम होणार आहेत.यापूर्वी बचतगटाची सोडत महानगरपालिकेत महापौर उषा ढोरे, विलास मडीगेरी, नामदेव ढाके, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे व समिती सदस्यांच्या उपस्थितीत पार पडली असून सर्व अर्जदारांना स्टॉलचे वाटप करण्यात आले आहे.

जत्रेच्या ठिकाणी एकूण 1225 स्टॉल असणार आहेत. त्यामुळे विविध वस्तू खरेदी करणा-यांसाठी तसेच खवय्यासाठी पवनाथडी जत्रा मेजवानी ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.