_MPC_DIR_MPU_III

Sangvi : भरधाव कारच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू

Sangvi: A young woman riding a two-wheeler died after being hit by a speeding car

एमपीसी न्यूज – भरधाव येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील चालक महिलेचा मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेल्या एकाला गंभीर दुखापत झाली. हा अपघात शुक्रवारी (दि.10) रात्री नऊच्या सुमारास सांगवीच्या रक्षक सोसायटी चौकाजवळ घडला. 

_MPC_DIR_MPU_IV

सुधा परसराम विश्वकर्मा ( वय. 27, रा. निसर्ग पूजा सोसायटी, मानकर चौक, वाकड) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. दुचाकीवर मागे बसलेल्या मयूर भालके याच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी चारचाकी चालक पृथ्वी गोपाळ हेमदेव (वय.22, राजवीर पॅलेस, कुणाल आयकॉन रोड,  पिंपळे सौदागर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

आदित्य दुर्गाप्रसाद श्रीवास्तव ( वय.31, रा. काळा खडक रोड, वाकड ) यांनी शनिवारी (दि. 11) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हेमदेव हा आपल़ी चारचाकी गाडी ( एमएच 12 डीई 2032) वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगाने रक्षक चौकाकडे जात होता. त्यावेळी पुढे चाललेल्या ( एमएच 14 ईएफ 8206 ) या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

मृत महिला ही फिर्यादी आदित्य श्रीवास्तव यांची मेहुणी होती. पोलिसांनी चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.