Sangvi : व्यक्तीचे अपहरण करून बनवला अश्लील व्हिडीओ; चौघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा एका महिलेसोबत अश्लील व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ आणि फोटो त्यांच्या साथीदारांना पाठवले. ही घटना शुक्रवारी (दि. 26) सकाळी साडे आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास औंध हॉस्पिटल ते बाणेर या दरम्यान घडली.

प्रवीण बाबी मिस्त्री (वय 32, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास अज्ञात चार इसमांनी प्रवीण यांचे औंध हॉस्पिटलकडून सांगवीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गातून अपहरण केले. आरोपींनी त्यांच्या मोटारीत बसवून प्रवीण यांना कात्रजच्या दिशेने नेले.

दरम्यान, आरोपींनी मोटारीत प्रवीण यांना जिवे मारण्याची धमकी देऊन एका महिलेसोबत अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. हे व्हिडिओ आणि फोटो आरोपींनी त्यांच्या साथीदारांना पाठवले. त्यानंतर आरोपींनी प्रवीण यांना बाणेर येथील ऑडी शोरूम समोर सोडून दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.