Sangvi : नायजेरियन व्यक्तीच्या मारहाणीत युगांडाच्या एका महिलेचा गर्भपात

संशयित नायजेरियन व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – नायजेरियन व्यक्ती आणि युगांडातील महिला यांच्या भांडणात युगांडाच्या एका महिलेचा गर्भपात झाला. ती महिला चार महिन्यांची गर्भवती होती.

याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने (रा. पिंपळे गुरव. मूळ रा. युगांडा) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, फ्रेड बोहो (वय 40, रा. पिंपळे गुरव. मूळ रा. नायजेरिया) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी महिला युगांडा या देशातील आहे. ती शिक्षणासाठी भारतात आली आहे. पुण्यात शिक्षण घेत असताना मागील काही महिन्यांपूर्वी ती ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहत होती. आरोपी नायजेरिया देशातील मूळ रहिवासी आहे.

आरोपी मागील सहा महिन्यांपासून महिलेशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, महिला त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ करीत होती. बोलण्यास टाळाटाळ करण्याच्या कारणावरून दोघांचे भांडण झाले. आरोपीने महिलेच्या पोटावर लाथ मारली. महिला चार महिन्यांची गर्भवती होती. पोटात मार लागल्याने तिचा गर्भपात झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.