Sangvi : जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात; एकजण गंभीर जखमी

पोलिसांनी जेसीबी चालकाला अटक केली आहे. : Accident due to negligence of JCB driver; One seriously injured

एमपीसी न्यूज – जेसीबी चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात होऊन एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात बुधवारी (दि. 12) सकाळी अकरा वाजता आनंदनगर, जुनी सांगवी येथे घडला. पोलिसांनी जेसीबी चालकाला अटक केली आहे.

रमेश सुखदेव मुसळे (वय 30, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या जेसीबी चालकाचे नाव आहे. निलेश भागवतराव तिडके (वय 40, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तिडके बुधवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या दुचाकीवरून कामाला जात होते.

ते आनंदनगर, जुनी सांगवी येथील स्टॅंपवेंडर ऑफिसच्या समोर आले असता आरोपी जेसीबी चालक जेसीबीच्या (एमएच 14 / सीजी 972) सहाय्याने एक मोठा सिमेंटचा पाईप घेऊन कुठलीही खबरदारी न घेता अचानक रस्त्यावर आला.

त्यामुळे सिमेंटच्या पाईपचा तिडके यांच्या हेल्मेटला धक्का लागला आणि ते रस्त्यावर पडले. या अपघातात तिडके गंभीर जखमी झाले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.