Sangvi Accident News : अपघातग्रस्ताकडे सापडलेला पाच लाखांचा ऐवज पोलिसांकडून नातेवाईकांकडे सुपूर्द

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जाताना अपघात होऊन ज्येष्ठ नागरिक जखमी झाला. त्यांना औंध रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान अपघातग्रस्त व्यक्तीकडे सापडलेला तब्बल पाच लाखांचा ऐवज पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना परत केला.

प्रभुलाल गोकुळ मनानी (वय 65) असे अपघात झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना शुभम विलास यंदे (वय 23) या तरुणाने औंध येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

_MPC_DIR_MPU_II

गुरुवारी (दि. 28) दुपारी प्रभुलाल मनानी त्यांच्या दुचाकीवरून राजीव गांधी पुलाजवळून जात होते. पुलाजवळ आल्यानंतर स्वतः मोटारसायकलवरून पडून त्यांचा अपघात झाला. त्यात ते जखमी झाले. शुभम यंदे या तरुणाने त्यांना उपचारासाठी औंध रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर औंध रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जावीर यांनी सांगवी पोलिसांना अपघाताची माहिती दिली.

तसेच डॉ. जावीर यांनी अपघातग्रस्त व्यक्तीकडे एक मोबाईल फोन आणि हातातील पर्स असल्याचे सांगितले. पोलिसांनी अपघातग्रस्त व्यक्तीची माहिती काढून त्यांचा मुलगा अमित प्रभुलाल मनानी (वय 39) यांच्याशी संपर्क केला. त्यांना रुग्णालयात बोलावून घेत 4 लाख 95 हजारांची रोकड व मोबाईल फोन असलेली पर्स अमित यांच्याकडे सुपूर्त केली.

ही कामगिरी सांगवीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, पोलीस उपनिरीक्षक भोंगळे, पोलीस नाईक पोटे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.