Sangvi : अवैधरित्या दारू विक्री आणि खरेदी करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या काळात दारू विक्री करण्यासाठी परवानगी नसताना एकाने बेकायदेशीररित्या दारू विक्री केली. तसेच त्याच्याकडून एकाने दारू खरेदी केली. याबाबत दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मजीबुल शुकुर शेख (वय 24, रा. नवी सांगवी), रोहित (पुर्ण नाव पत्ता माहीती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस शिपाई सुरेश जायभाये यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारू विक्री करण्यावर पूर्णतः शासनाने निर्बंध घातले आहेत. असे असतानाही आरोपी शेख याने मंगळवारी (दि. 14) रात्री दहाच्या सुमारास स्वतःकडे मोठ्याप्रमाणात मद्यसाठा विक्रीसाठी ठेवला. मद्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी त्याच्याजवळ गर्दी केली.

या कृत्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याचि धोका निर्माण झाला. याबाबत शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शेख याला आरोपी रोहित याने मद्यसाठा पुरवला असल्याने त्याच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींकडून 96 बिअरच्या बाटल्या आणि रोख रक्कम असा एकूण 17 हजार 40 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.