Sangvi : पोस्ट ऑफिसच्या टेरेसवरून इंटरनेट डिव्हाईस चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथे असलेल्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीच्या टेरेसवरून अज्ञात चोरट्यांनी इंटरनेटचे डिव्हाईस चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 19) सकाळी सव्वानऊ वाजता उघडकीस आली आहे.

कृष्णकुमार विलास केंगार (वय 37, रा. गणेशनगर, दापोडी) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 20) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केंगार पिंपळे गुरव येथील पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करतात. रविवारी (दि. 18) सायंकाळी सहा ते सोमवारी (दि. 19) सकाळी सव्वा नऊ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी पोस्ट ऑफिसच्या टेरेसवरून 15 हजार रुपये किमतीचे सीफी आर एफ कंपनीचे इंटरनेट डिव्हाईस चोरून नेले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.