Sangvi : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक; 14 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचुन अटक केली. त्यांच्याकडून 14 किलो गांजा आणि मोटार असा 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. सांगवी फाटा ते रक्षक सोसायटी दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

कय्युम युनूस पठाण (वय 39, रा. वाकड), आसिफ शमशुद्दीन शेख (वय 28, रा. वडनेर, उस्मानाबाद) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना सांगवी फाटा ते रक्षक सोसायटी दरम्यान रस्त्यावर एक संशयित स्विफ्ट मोटार (एम एच 14 / ई वाय 0649) उभी असल्याची माहिती पोलीस शिपाई प्रसाद कलाटे यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असता अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून मोटार ताब्यात घेतली. मोटारीची झडती घेतली असता त्यामध्ये 14 किलो वजनाचा गांजा मिळाला. पोलिसांनी गांजा व मोटार असा 7 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला असून गांजा विक्रीसाठी आलेल्या मोटारीतील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना पुढील तपासासाठी सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.