BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : मुलगा होत नसल्याने अमेरिकेत राहणा-या सूनेचा छळ; पतीसह सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मुलगा होत नाही, तसेच लग्नात सूनेच्या माहेरच्या मंडळींनी कमी खर्च केला. यावरून सासरच्या मंडळींनी अमेरिकेत राहणा-या सूनेचा छळ केला. ही घटना 12 डिसेंबर 2008 ते 13 ऑगस्ट 2019 या कालावधीत अमेरिका, पुणे आणि जालना येथे घडली.

याप्रकरणी 38 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती राहुल देविदास घोडतुरे (वय 40), सासू कावेरी देविदास घोडतुरे, सासरे देविदास कडप्पा घोडतुरे (सर्व रा. मंठा रोड, जालना) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि तिचा पती कामानिमित्त अमेरिकेत राहतात. महिलेला मुलगा होत नसल्याने तिच्या सासरच्या मंडळींनी मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

तसेच महिलेच्या माहेरच्या मंडळींनी तिच्या लग्नात खर्च कमी केला. यावरून पीडित महिला पुणे आणि जालना येथे असताना तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत विवाहितेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3