Sangvi : पिंपरी-चिंचवड शहरातून पाच दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, हिंजवडी, वाकड आणि चिखली भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1 लाख 40 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत.

पहिल्या प्रकरणात आकाश अशोक गारगोटे (वय 21, रा. विनायक नगर, पिंपळे गुरव) यांनी मंगळवारी (दि. 21) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश यांची 50 हजार रुपये किंमतीची एमएच 14 / जीबी 1199 ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 20) सकाळी उघडकीस आली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणात शितल राजेश उज्जैनकर (वय 28, रा. बाणेर. मूळ रा. अकोला) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शीतल यांनी त्यांची एम एच 30 / डब्ल्यू 7817 ही 30 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी बाणेर येथील खासगी कंपनीच्या पार्किंगमध्ये उभी केली. अज्ञात चोरट्याने भर दिवसा त्यांची दुचाकी चोरून नेली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

तिस-या प्रकरणात उमेश सुरश पवार (वय 35, रा. नगरसेवक कैलास बारणे यांच्या कार्यालयाजवळ, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर रोजी पवार यांनी आपली 25 हजार रुपये किंमतीची एम एच 14 / इ डब्ल्यू 8193 ही दुचाकी राहत्या घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

चौथ्या प्रकरणात अमोल बाबूराव पेठे (वय 33, रा. किसन मदने नगर, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पेठे यांनी आपली 20 हजार रुपये किंमतीची एम एच 25 / ए जी 5066 हि दुचाकी 23 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता राहत्या घराजवळ उभी केली होती. दुसऱ्या दिवशी त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

पाचव्या प्रकरणात बाळासाहेब गोपीनाथ आंधळे (वय 32, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आंधळे यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 14 / डी वाय 2138 ही दुचाकी रविवारी (दि. 19) रात्री नऊ वाजता घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.