Sangvi : सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये आणखी तीन वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज – सांगवी, देहूरोड आणि चाकण परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 25) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अभिषेक यादव (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 14 / ई आर 5367) 17 डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता राहत्या इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

सुधीर बाजीराव नवगिरे (वय 36, रा. शिंदे वस्ती, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुधीर यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 14 / ए जी 7063) घरासमोर पार्क केली. दुचाकीचे हँडललॉक तोडून दुचाकी चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

संजय श्रीपती दास (वय 42, रा. खराबवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 14 / डी एस 9442) त्यांच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.