Sangvi : वेबसाईटवरील मैत्री पडली महागात; शरीरसंबंध ठेवल्यानंतर महिलेने केले ब्लॅकमेल

एमपीसी न्यूज – वेबसाईटवरून मैत्री झालेल्या महिलेने एका ग्राहकाकडून पैसे घेऊन दुस-या महिलेला त्याच्याकडे शरीरसंबंध ठेवण्यास पाठवले. ग्राहक व्यक्तीने त्या महिलेशी दोनवेळा शरीरसंबंध ठेवून एकवेळचेच पैसे दिले. त्यामुळे महिलेने ग्राहकाकडे आणखी पैशांची मागणी केली. ग्राहक पैसे देण्यास तयार झाल्यानंतर देखील महिलेने आणखी जास्त पैशांची मागणी करून घरच्यांना याबाबत सांगण्याची धमकी दिली. हा प्रकार रविवारी (दि. 6) सायंकाळी पाच ते सोमवारी (दि. 7) सायंकाळी सहाच्या सुमारास पिंपळे गुरव आणि सांगवी येथे घडला.

या प्रकरणी चिंचवड येथे राहणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित दोन्ही महिलांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची लोकॅन्टो या वेबसाईटवरून आरोपी महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. रविवारी फिर्यादी यांनी आरोपी महिलेला अडीच हजार रुपये दिले. त्या बदल्यात दुसऱ्या महिलेला शरीरसंबंध ठेवण्यासाठी फिर्यादीकडे पाठवले. फिर्यादीने तिच्याशी दोन वेळा शरीरसंबंध ठेवले. यानंतर शरीरसंबंध ठेवलेल्या महिलेने फिर्यादीला फोन करून एकवेळचे पैसे देऊन दोन वेळा शरीरसंबंध ठेवल्याने आणखी पैसे देण्याची मागणी केली. त्यावर आणखी 1 हजार 500 रुपये देण्यासाठी फिर्यादी तयार झाले.

त्यानंतर रविवारी रात्री संबंधित महिलेने फिर्यादीच्या व्हाट्स अपवर मेसेज करून 50 हजार रुपयांची मागणी केली. 50 हजार रुपये न दिल्यास झाल्या प्रकाराबाबत बायको आणि सास-यांना सांगणार असल्याची तसेच त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी येऊन तमाशा करण्याची धमकी दिली. दोघांमध्ये तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम अभय यांनी आरोपी महिलेला दिली. फिर्यादी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर दोन्ही महिलांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.