Sangvi : धुळवडीच्या रंगाचा बेरंग; अल्पवयीन मुलावर फेकले अॅसिड

एमपीसी न्यूज – धुळवडीच्या रंगाचा बेरंग झाल्याचा प्रकार सांगवी येथे घडला आहे. एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या अल्पवयीन मुलाच्या अंगावर अॅसिड सारखा ज्वलनशील पदार्थ फेकला. त्यामध्ये आठ वर्षीय मुलगा गंभीररीत्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे.

 

याप्रकरणी जखमी मुलाच्या 35 वर्षीय वडिलांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अॅसिड फेकणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

_MPC_DIR_MPU_II
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुले सांगवी परिसरात एकाच भागात राहतात. मंगळवारी सकाळी धुळवडीनिमित्त दोघेही रंग खेळण्यासाठी घराबाहेर पडले. रंग खेळत असताना एका अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावर अॅसिडसारखा ज्वलनशील पदार्थ फेकला. यामध्ये मुलाच्या अंगातील टी शर्टसह कातडी देखील जळाली आहे. जखमी मुलाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.