Sangvi: फ्लॅटचे कुलूप तोडून एक लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – कुलूप लावून बंद असलेल्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. त्यामध्ये 80 हजार रुपयांची रोख रक्कम आणि अठरा हजार रुपये किमतीचे सोने चोरट्यांनी चोरले. हा प्रकार सोमवारी (दि. 13) रात्री अकराच्या सुमारास पिंपळे निलख येथे उघडकीस आला.

जयंत एकनाथ वाघुले (वय 37, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत हे त्यांच्या कामानिमित्त रविवारी सकाळी 11 वाजता बाहेर गेले. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

चोरट्यांनी 80 हजार रुपयांची रोख रक्कम आणि 18 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 98 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. सोमवारी रात्री अकराच्या सुमारास जयंत घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.