_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Sangvi : फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज – फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला ‘तुमच्या कामामुळे माझे केबलचे कनेक्शन तुटले आहे’ असे म्हणून लोखंडी सळईने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

धनराम दशरथ खराटे (वय 23, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तेजस शिंदे (रा. पिंपळे निलख) व त्याचे दोन अनोळखी मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनराम हे पिंपळे निलख येथे डीपी रस्त्याच्या फूटपाथवर ब्लॉक बसविण्याचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘तुमच्या कामामुळे माझ्या केबलचे कनेक्शन तुटले आहे’, असे म्हणून त्यांनी धनराम यांना शिवीगाळ केली. तसेच मारहाण करून सळईने डोक्यात मारून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.