Sangvi : घरफोडी करून चांदीची भांडी चोरली

एमपीसी न्यूज – पिंपळे निलख परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. यामध्ये चोरट्यांनी चांदीची भांडी आणि एअरटेल व जिओ कंपनीचे डेटा कार्ड चोरून नेले. ही घटना सोमवारी सकाळी पाचच्या सुमारास उघडकीस आली.

रवी रामचंद्र पवार (वय 36, रा. पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी पवार हे कामानिमित्त बुधवारी (दि. 8) सकाळी 11 वाजता बाहेर गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा लॅचलाॅक व कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी चांदीची भांडी व एअरटेल आणि जिओ कंपनीचे डेटा कार्ड असा एकूण पाच हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरून नेला. रवी सोमवारी सकाळी पाच वाजता घरी आले, त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ सांगवी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.